बेळगाव शहरात सर्व रुग्णालयामधून कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत. सुरुवातीला केवळ सरकारी रुग्णालयात हे उपचार करता येणे शक्य होते. परंतु कालांतराने सरकारने सर्व खाजगी रुग्णालयातही उपचार करण्याचे आदेश दिले. दरम्यान कोरोनावरील उपचारासाठी सर्वच रुग्णालयातून जादा शुल्क आकारण्यात येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना हे शुल्क परवडणारे नाहीत. खर्च करण्याची परिस्थिती नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेऊन या मनमानी कारभाराविषयी आवाज उठविण्यासाठी कंग्राळी खुर्द येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात कंग्राळी बी के व कंग्राळी खुर्द ग्रामस्थ, मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत या प्रकाराबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच रुग्णालयाकडून आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त खर्चाच्या विरोधात गुरुवार दिनांक २९ ऑकटोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
येत्या गुरुवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बेळगाव तालुक्यातील गावाच्या नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.