Sunday, May 5, 2024

/

अनगोळ, शहापूर आणि वडगांवच्या मालमत्ता दरात अनेक पटीने वाढ

 belgaum

बेळगाव शहराबरोबरच अनगोळ, शहापूर आणि वडगांव या उपनगरांमधील जागांचे बाजार मूल्य मागील 13 वर्षापासून कितीतरी पटीने वाढले आहे. या सर्व उपनगरांमध्ये बेळगांवपासून अनगोळला जोडणारा मुख्य अनगोळ रोड मालमत्ता दराच्या बाबतीत सर्वाधिक महागडा आहे. मागील 13 वर्षात सध्या अनगोळ मेन रोडवरील निवासी व व्यापारी मालमत्तांचे बाजार मूल्य उच्चांकी झाले आहे.

अनगोळ हे भाग्यनगर, चिदंबरनगर आदी उपनगरांनी वेढले आहे. गेल्या 1997 साली मुद्रांक व नोंदणी विभागाने अनगोळ मुख्य रस्त्यावरील निवासी मालमत्तांचे बाजार मूल्य 115.05 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांचे बाजार मूल्य 225.01 रु. प्रतिचौरस फूट असे केले निश्चीत होते. आता 2020 मध्ये त्यात इतकी प्रचंड वाढ झाली आहे की, सध्या येथील निवासी मालमत्तेसाठी 4,450 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांसाठी 6,230 रु. प्रति चौरस फूट इतके बाजार मूल्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र मुद्रांक व नोंदणी खात्याने निश्चित केलेल्या या सरकारी बाजार मूल्यापेक्षा प्रत्यक्षातील दर गगनाला भिडलेले आहेत. सध्या अनगोळ -हरी मंदिर परिसरातील निवासी मालमत्तेचा दर 3,220 रु. प्रति चौरस फूट आणि व्यापारी मालमत्तेचा दर 4,508 रु. प्रति चौरस फूट इतका आहे.

अनगोळ प्रमाणे शहापूर परिसरातील रियल इस्टेट तेजीत आहे. खडेबाजार -शहापूर येथील निवासी मिळकतींचे बाजार मूल्य 3,060 रु. प्रति चौरस फूट आणि व्यापारी मिळकतींचे बाजार मूल्य 4,284 रु. प्रति चौरस फूट इतके झाले आहे. शहापूरचा विचार करता 1997 मध्ये येथील निवासी मालमत्तांचा दर 158.03 रु. प्रति चौरस फूट तर व्यावसायिक जागांचा दर 320.06 रु. प्रति चौरस फूट इतका होता. सध्या शहापूर मध्यवर्ती भागात निवासी मालमत्तांचा दर 2,360 रु. प्रति चौरस फूट आणि व्यापारी मालमत्तांचा दर 3,304 रुपये प्रति चौरस फूट इतका निश्चित करण्यात आला आहे. शहापुरातील खडेबाजार, सराफ गल्ली, मिरापुर गल्ली व कचरी गल्ली या भागातील दर एक सारखे आहेत.Vadgaon road

 belgaum

बाजार गल्ली, नाझर कॅम्प, सराफ गल्ली यासह शहापूरला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे वडगांवलाही महत्त्व येत आहे. वडगांवचा विस्तार वाढत चालला असून दरही वाढू लागले आहेत. वडगांवमध्ये मुद्रांक आणि नोंदणी विभागाने निवासी मालमत्तांचा दर 1500 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांचा दर 2,100 रु. प्रति चौरस फूट इतका निश्चित केला आहे. हाच दर 1997 ला निवासी मालमत्तेसाठी केवळ 100 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांसाठी 230.08 रु. इतका होता.

अनगोळला जोडून असलेल्या भाग्यनगर येथे अंतर्गत प्रशस्त रस्त्याबरोबरच उच्चभ्रू वसाहती वाढत असल्यामुळे वडगांव पेक्षाही भाग्यनगरमधील जागांचे बाजार मूल्य मुद्रांक आणि नोंदणी खात्याने अधिक केले आहे. भाग्यनगरमध्ये निवासी मालमत्तांचे दर 1,980 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांचे दर 2,772 रु. प्रति चौरस फूट निश्चित केले आहेत. हिंदवाडी येथील सुभाष मार्केट, डॉ. राधाकृष्ण मार्ग, रानडे कॉलनी येथील मालमत्तांचे दर अलिकडच्या काळात वाढले आहेत. सध्या येथील निवासी मालमत्तांचा दर 3050 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी मालमत्तांचा दर 4,270 रु. प्रति चौरस फूट इतका निश्चित करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.