Saturday, April 20, 2024

/

बाजार वर्षांचा की लॉकडाउनचा

 belgaum

कोरोना महामारीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना नागरिक मात्र घराबाहेर पडून स्वतः बरोबरच अनेकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार वाढला आहे.

बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता वर्षांचा बाजार की लॉकडाऊनचा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. होणारी गर्दी चिंताजनक असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतआहे. बाधितांची आणि बळींचीही संख्या वाढत आहे. असे असतानाही बेळगावातील जनता मात्र शहाणी व्हायला तयार नाही. Rush

लॉकडाउनमध्ये खरेदीसाठी दिलेल्या मुदतीत बाजारपेठांत तोबा गर्दी करून नागरिकांनी हे सिद्ध केले आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने राज्यात कडक लॉकडाउन जारी केला आहे.

केवळ सकाळी ६ ते १० या वेळेतच कोरोना मार्गसूचीचे पालन करत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची सवलत दिलेली आहे. तथापि नागरिक मात्र मार्गसूचीचे उल्लन्घन करत सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवत बाजारात तोबा गर्दी करत आहेत.

भाजीपाला, दूध, फुले, फळे, किराणा आदी साहित्य खरेदीसाठी गणपत गल्ली, रविवारपेठ आदी भागात गर्दी करत आहेत. नागरिकांनी शहाणे होण्याची गरज असून याकडे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.