उपनोंदणी कार्यालयाची “या” दोन ठिकाणी झाली विभागणी

0
 belgaum

अखेर महापालिकेच्या मालमत्तांची बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर अशा दोन विभागात उपनोंदणी कार्यालयाची विभागणी केली असून लवकरच दोन विविध कार्यालये सुरु करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

बेळगाव दक्षिण विभागात २२४ मालमत्ता विभागांचा तर बेळगाव उत्तरामध्ये १८९ मालमत्ता विभागांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिका अखत्यारीत एकूण ४०८ मालमत्ता परिसर आहेत. तामध्ये गांव, प्रभाग, सर्व्हे क्रमांक आदींचा समावेश आहे. उपनोंदणी कार्यालयाने या मालमत्ता परिसर निवड करताना एक गल्ली, प्रभाग अथवा सलग जागा आणि गावांची निवड केली आहे. यामुळे सर्व्हे क्रमांक आता सलग आहेत.

bg

महापालिकेच्या दक्षिण विभागीय महसूल विभागीय कार्यालयाच्या हद्दीचा विचार करून बेळगाव दक्षिण विभागात प्रामुख्याने या विधानसभा मतदार संघातील भागाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अलारवाडपासून अनगोळ, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, खासबाग, भारतनगर, स्मार्टननगर, होसूर हिंदवाडी, एसपीएम रोड, मंडळी रोड आदी भागांचा समावेश करण्यात आला आहे. तर बेळगाव उत्तर विभागात मध्यवर्ती बेळगाव परिसरातील सर्व गल्ल्यांसह आंबेडकर रोड, कॉलेज रोड, कोर्ट कंपाउंड, माळमारुती, हिंडलगा, डिफेन्स कॉलनी, काकती येथील शहराच्या हद्दीतील परिसर, तसेच कणबर्गी, कंग्राळी(बी.के).,शहर हद्द, बॉक्साइट रोड, वैभव नगर, कंग्राळी खुर्द शहर हद्द आदी भागाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यमनापूर गावाचाही समावेश बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात करण्यात आला आहे. यमनापूर हे गाव प्रत्यक्षात बेळगाव उत्तरमध्ये आहे. परंतु या गावाचा समावेश बेळगाव दक्षिण विभागात करण्यात आला आहे.

सध्या उपनोंदणी कार्यालचे कामकाज एकाच ठिकाणी होत असून या कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यासाठी आता सरकारने दुसऱ्या उपनोंदणी कार्यालयाला मंजुरी दिली आहे. हे दुसरे कार्यालय गोवावेस परिसरात सुरु होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.