Thursday, April 25, 2024

/

आई मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 belgaum

हलगा येथे बेकरी दुकान चालवणाऱ्या आई मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.

भारती सुरेश घरानी वय 36 रा.हलगा व प्रज्वल सुरेश घरानी वय 15 असे या माय लेकरांची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत भारती व तिचा मुलगा प्रज्वल हे दोघे जण हलगा येथील भाडोत्री घरात रहात होते व उपजीविकेसाठी बेकरी व्यवसाय करत होते. ते मूळचे गोकाक तालुक्यातील एका खेड्यातील असून सध्या हलग्यात वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.

 belgaum

भारती यांना पहिल्या नवऱ्याने सोडले होते त्यांना कौटुंबिक समस्या होत्या त्यातून नैराश्ये मधून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय आहे.या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.