Thursday, April 25, 2024

/

मच्छे डबल मर्डरचे रहस्य काय?

 belgaum

शनिवारी मच्छे येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणाचा अजूनही उलगडा झाला नसून हे खून नेमक्या कोणत्या कारणासाठी केले गेले आणि खुनामागे कोणाचा हात होता? हे अजूनही रहस्यमय आहे.

यासंदर्भात प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून काल खून करण्यात आलेल्या या दोन तरुणी दोन आठवड्यांपूर्वीच मच्छे येथे वास्तव्यास आल्या होत्या.

काल सायंकाळी वॉकिंग साठी निघालेल्या या तरुणींच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यानंतर चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या दोघीही मूळच्या काळ्यानट्टी या गावातील असून त्यांच्या मृतदेहावर आज काळ्यानट्टी या गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

 belgaum
Machhe double murder
Machhe double murder

मृत तरुणींपैकी एक तरुणी गर्भवती असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी या तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला. परंतु पंचमंडळींच्या मध्यस्थीनंतर दोन्हीही तरुणींवर काळ्यानट्टी गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

खून करण्यात आलेल्या रोहिणी आणि राजश्री या दोन्हीही तरुणींनी दोन वेगवेगळ्या तरुणांशी प्रेमविवाह केला होता. अनेक वर्षे काळ्यानट्टी यागावातच त्या वास्तव्यास होत्या. परंतु मागील दोन आठवड्यांपूर्वी अचानक गाव सोडून त्या मच्छे येथे वास्तव्यासाठी आल्या होत्या. अचानकपणे गाव का सोडावे लागले? याचा तपास पोलीस घेत आहेत.

खून करण्यात आलेल्या तरुणींच्या आयुष्याची शोकांतिका नेमकी काय आहे? त्यांचा खून करून कोणी आपला डाव साधला? कि खून करण्यासाठी कुणाला प्रेरित करण्यात आले? अचानकपणे मच्छे येथे आल्यानंतर इतक्या कमी कालावधीत यांच्या हालचालींवर कोण लक्ष ठेवत होते? खून कोणत्या मानसिकतेतून करण्यात आला आहे? या सर्व गोष्टींचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.