बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार कामाला सुरुवात झाली. मात्र खरंच विकास होत आहे का हा प्रश्न अनेकांना अंतर्मुख करणारा आहे. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट सिटी योजनेचा विकास होईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळेच स्मार्ट सिटी योजनेचा घोळ आणि विकासाचा झोल अशी अवस्था झाली आहे. दरम्यान बेळगावातील अनेक रस्ते उघडून ठेवण्यात आले आहेत. गटारीचे काम अर्धवट टाकण्यात आले आहे आणि विकासाची पोचपावती दाखवण्यापेक्षा त्याचा भोपळा करण्यात धन्यता मानणाऱ्या प्रशासनाने नागरिकांच्या दृष्टिकोनातून विकासाचे पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठिकठिकाणी कामे राबविण्यात येत आहेत. मात्र ती योग्य पद्धतीने होत आहेत का किंवा कोणत्याही नागरिकाच्या विश्वासातून आणि नागरिकांना विश्वासात घेऊन ते करण्यात येत आहेत का? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मनमानी कारभारामुळे अनेक रस्ते अर्धवट पडले आहेत तर विकासाच्या गतीला नवीन चाके लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान याकडे अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन जी अर्धवट कामे आहेत त्यांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बेळगाव शहर आणि परिसरात अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे. विकासाचा शब्द अनेक अधिकाऱ्यांना माहिती नाही मात्र त्यांना ते माहिती करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून होत आहे.