Saturday, April 27, 2024

/

हृदयविकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

आधुनिक जगामध्ये झपाट्याने वाढणारा हा आजार आहे. डायबेटिसनंतर धोकादायक रोगांमध्ये या विकाराचा नंबर लागतो. हृदयालाच रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या कडक व अरुंद होतात. त्यामुळे रक्ताची गाठ बनते व ती रक्तवाहिनीत अडकून रक्तप्रवाह बंद होतो किंवा अत्यंत कमी होतो. त्यामुळे ह्दयस्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने हृदयक्रिया बंद होऊन मृत्यू ओढावू शकतो. हे असे ब्लॉक तयार झाल्यास अँजिओग्राफीद्वारे किती टक्के ब्लॉक आहेत हे पाहिले जाते व अँजियोप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केली जाते.

कारणे
1) कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईड्स यामुळे मेदयुक्त पदार्थ रक्तवाहिन्याची पोकळी कमी करतात व रक्तवाहिन अरुंद होते.
2) उच्च रक्तदाब
3) युरिक अ‍ॅसिडचे रक्तातील प्रमाण वाढते.
4) मधुमेह
5) लठ्ठपणा
6) धूम्रपान
7) व्यायामचा आभाव
या प्रत्येक कारणामुळे किंवा दोन तीन कारणांचा एकत्रित परिणाम होऊन हृदयरोग होतो. यातील बरीच कारणे आहाराशी निगडित आहेत. सतत काळजी करण्याने अ‍ॅड्रीनल ग्रंथींना जास्त प्रमाणात अँड्रीनलीन व कॉर्टीसोन ही द्रव्ये स्रवावी लागतात. त्याचा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांचा संकोच वाढतो. रक्तदाब वाढतो व हृदयाचे कामही वाढते.

लक्षणे
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे श्‍वास अडक्यासारखा वाटतो. छातीत कळ येते ती खांद्यापर्यंत जाते. छाती धडधडते, चक्कर येते, मानसिक अस्वस्था जाणवते, हातयार गार पडतात, खूप घाम येतो, थकवा जाणवतो.

 belgaum

उपचार
आहार उपचार
द्राक्षे- बीज असणारी द्राक्षे हृदयरोग कमी करण्यास मदत करतात, अशी द्राक्षे खावीत किंवा द्राक्षाचा रस घ्यावा. परंतु मधुमेहसुध्दा असल्यास ग्रेपसीड एकस्ट्रॅक्टची तयार कॅप्सुल मिळते, ती घ्यावी
आवळा- शरीरातील सर्वच संस्थांचे कार्य उत्तम रितीने चालवण्यासाठी आवळा जरूर खावा. थकवा घालवण्यासाठी तसेच शरीरात तयार झालेले विविध अनिष्ट पदाथ्र आवळ्यामुळे नष्ट केले जातात. आवळ्याचे वाळवलेले तुकडे वर्षभर उपयोगी पडतात.

कांदा- हृदयविकारात अनशेपोटी कांद्याचा एक चमचा रस प्यावा.
शतावरी व मध- हृदय कमकुवत झालेल्या व हृदयाचा आकार वाढलेल्या रूग्णांनी शतावरीचा ताजा रस दोन चमचे व मध एक चमचा एकत्र करून दिवसातून तीनदा घ्यावे. शतावरी वनस्पती वाफेवर शिजवून खाल्यानेही फायदा होतो.
लसूणपात- लसूनपपातीचा रस पाऊण कप व तेवढाच गाजराचा रस मिसळून रोज घ्यावा.
कारडईचे तेल- रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी करडई तेलाचा वापर करावा. करडईपासून बनवलेले सफ्लोक्सिन सिप्ला नावाचे तेल उच्च रक्तदाब व हृदयरोग असणार्‍यांनी वापरावे.

ई जीवनसत्व- यामुळे ऑक्सिजन वहन करण्याची रक्ताची ताकद वाढते. रक्ताभिसरण व स्नायूंचे कार्य व्यवस्थित होते. कोंडायुक्त धान्यपिठे, हिरव्या पालेभाज्या, कोबीची बाहेरची पाने यात ई जीवनसत्व भरपूर असते.
क जीवनसत्व- राग, भिती, निाराशा व ताणतणावया भावनातून आलेल्या ताणामुळे रक्तातील मेद व अतिरिक्त कोलेस्टेरॉल यांची पातळी वाढतच राहते. परंतु शरीरात पुरेसे क जीवनसत्व व पँटोथेनिक आम्ल यांची पातळी व्यवस्थित असेल तर तणावांचे हृदयावर कमी दुष्परिणाम होतातऽ
संत्री, मोसंबी, लिंबु ही फळे आवर्जुन खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा आवर्जुन समावेश करावा. हृदयविकाराच्या रूग्णांचा आहार कमी उष्मांकाचा, दूधयुक्त व शाकाहारी असावा. आहारात मीठ, सााखर तसेच मैदा वर्ज्य करावा. पूर्णाश धान्ये, कडधान्ये, ताजी फळे, भाज्या खाव्यात. चहा, कॉफी, तंबाखू मद्य वर्ज्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.