Saturday, December 21, 2024

/

अबब…एका दिवसांत वाढले दोन हजार कोरोनाचे रुग्ण

 belgaum

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 27 रुग्णांसह राज्यात 2,062 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 54 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 8 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 28,877 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 470 झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल सत्तावीस रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 441 इतकी वाढली आहे.

बेळगावातील कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह कॅसिस 92 असून आज बुधवारी 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 342 झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या अद्याप 7 आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 8 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 2,062 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28,877 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 16,527 असून यापैकी 452 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राज्यभरात शनिवारी 778 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 11876 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 54 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 470 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी गेल्या 24 तासात चामराजनगर व कोडगू जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1,148 रुग्ण – एकूण रुग्ण 12,509), मंगळूर (183-1534), धारवाड (89-757), आणि बेळगाव (27-441).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.