Friday, April 26, 2024

/

राज्यात पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक : एका दिवसात आढळले 4,537 रुग्ण

 belgaum

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यासह राज्यात पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 18 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 4,537 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 59,652 इतकी झाली आहे. राज्यात आणखी 93 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,240 झाली आहे.

गेल्या गुरुवारनंतर बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून नव्याने 137 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 926 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 498 असून आणखी 3 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांचा आकडा 24 झाला आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात 27 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 404 इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 18 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 4,537 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 59,652 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 36,631 असून यापैकी 580 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज शनिवारी 1,018 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 21,775 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 93 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,240 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2125 रुग्ण – एकूण रुग्ण 29621), मंगळूर (509-3306), धारवाड (186-1917) आणि बेळगाव (137-926).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.