Thursday, April 25, 2024

/

राज्यात कोविडच्या तब्बल 25,839 अॅक्टिव्ह केसेस

 belgaum

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 64 रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 2,496 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 14 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 44,078 इतकी झाली आहे. राज्यात सध्या तब्बल 25,839 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 13 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 14 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 2,496 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 44,077 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 25,839 असून यापैकी 540 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राज्यभरात आज मंगळवारी 1,142 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 17,390 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 87 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 842 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात हावेरी वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1267 रुग्ण – एकूण रुग्ण 20,969), म्हैसूर (125-1091), कलबुर्गी (121-2313) आणि बेळगाव (64-561).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.