डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्चिम व पूर्व आफ्रिका, वेस्ट इंडिज, पॅसिफिक आयर्लड्स व साऊथ अमेरिका येथे याचा प्रादुर्भाव आढळून येतो. एकदा जर हा विषाणू शरीरात शिरला तर कायम शरीरात वास्तव्य राहतो.
कारणे : अस्वच्छता, पाण्याची डबकी साठून त्यावर डासांची पैदास होणे, शारिरीक स्वच्छतेचा अभाव व मच्छरदाण्यांचा वापर न करणे ही महत्त्वाची कारणे होत.
लक्षणे : काही व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव झाल्यावर देखील काहीही लक्षणे आढळत नाहीत. लहान मुलांमध्ये सर्दी पडसं, जुलाब आणि खूप ताप येणे अशी लक्षणं दिसतात. व्यक्तींमध्ये मात्र अचानक खूप ताप येतो. प्रचंड डोके दुखते. सांधेदुखी, स्नायुदुखी आणि अंगावर खूप पूरळ येतात. हाडं फोडून काढणारा ताप अशी डेंग्यूची ख्याती आहे. त्यामध्ये एक खास असा प्रकार नसतो, ठराविकता नसते. नंतरच्या टप्प्यामध्ये छातीत व पोटात पाणी भरते महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. आतड्यांमध्ये पोटातल्या इतर अवयवांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे शरीर नित्राण होते. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे रक्तीपुरळ उठतात.
कधीकधी शरीरात पाणी धरुन ठेवण्याचे प्रमाण जास्त झाल्यास मेंदूवर ताण येऊन फिट्स येऊ शकतात. शुद्ध हरपते, लिव्हर फेल्युअर होऊ शकते. क्वचित जी-बी सिंड्रोम नावाच्या विकारामुळे तीव्रता वाढू शकते.
उपचार : हा आजार कधीही घातक ठरु शकतो. त्यामुळे रुग्णाला इस्पितळात भरती करुन उपचार करणे योग्य ठरते. शरीरातील पाण्याची व क्षारांची पातळी योग्य राखावी लागते. कधी कधी संपूर्ण रक्त द्यावे लागते. आयबू बु्रफेन व अॅस्पीरीनचा उपयोग टाळावा लागतो कारण त्यामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढतो.
होमिओपॅथी : लक्षणांवरुन, शरीरावर उठणार्या पुरळावरुन अगणीत होमिओपॅथीक औषध अक्षरक्ष: जादू केल्यासारखी काम करतात.
युपॅटोरिया : हाडताप, घाम आल्याने बरे वाटते. प्रचंड अंगदुखी
रसटॉक्स : स्नायुदुखी, बेचैनी, फिरत हिंडत राहिल्याने आराम वाटतो.
जेल्सेमियम : पाठीमध्ये थंडकळ मारते. स्नायू खरवडल्यासारखे दुखतात, मंद डोके दुखी
प्रतिबंध
डासांची पैदास थांबवण्यासाठी डबक्यांमध्ये, तळ्याविहिरीमध्ये गप्पी मासे (पोसिला रेटीक्युलाय) सोडावेत व डासांची अंडी फस्त करुन पाणी स्वच्छ ठेवतात.
डासांपासून संरक्षण करण्यासाठी पावसाळ्या आधी किटकनाशक फवारणी करुन घ्यावी. मच्छरदाणीचा वापर करावा. परिसरात स्वच्छता राखावी.