Friday, January 31, 2025

/

माजी नगरसेवक, उपमहापौर हॅकर च्या रडारवर; गरज कारवाईची

 belgaum

बेळगावात फेसबुक अकाउंट हॅकर ने धुमाकूळ घातला आहे. माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरांची फेसबुक अकौंटस हॅक करून मेसेंजर मधून पैशांची मागणी केली जात आहे.

यामधून आर्थिक लुबाडणूक सुरू असून त्या हॅकर चा शोध घेऊन लागलीच कारवाई करावी लागणार आहे. संबंधीत माजी नगरसेवक आणि अकाउंट हॅक झालेल्यांनी सायबर पोलिसात तक्रार देऊन कारवाई करावी.

सावधान
बेळगावातील बऱ्याच लोकांचे फेसबुक हॅक करून पैशाची मागणी केली जात आहे. 2 दिवसांपूर्वी माजी नगरसेवक विजय भोसले यांचे खाते हॅक झाले होते. तसेच माजी उपमहापौर संजय शिंदे यांचे फेसबुक हॅक करून पैशाची मागणी केली जात आहे.

 belgaum
Hack fb account
Hack fb account

तेव्हा कोणतीही खातरजमा केल्या शिवाय कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. असे आवाहन आज करण्याची गरज आहे. ओळखीतल्या फ्रेंड्स ना हॅक केलेल्या खात्यावरून पैसे मागितले जात आहेत. यामुळे हॅकर बेळगावतीलच असल्याचा संशय आहे.

मला गरज आहे, अडचणीत आहे, थोडे पैसे पाठवा असे सांगून पैसे मागणाऱ्या आणि यासाठी समाजात ओळख असलेल्या व्यक्तीच्या फेसबुक खात्याचा वापर करणाऱ्या हॅकर चा शोध सायबर पोलिसांनी लवकर लावावा आणि यासाठी ज्यांची खाती हॅक झाली त्यानि पुढे यावे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.