कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या ठिकाणी आढळतो ते घर अथवा कार्यालयाचा परिसर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सील डाऊन करून “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित केला जातो.
Kgis.ksrsac.in ने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात असे 101 कंटेनमेंट झोन आहेत. त्याचप्रमाणे 15 ॲक्टिव्ह झोन्स असून 86 झोन्स डीनोटिफाईड करण्यात आले आहेत.
वेबसाईटवरील नकाशानुसार कंटेनमेंट झोनसह बफर झोन 200 मीटरचा आहे. त्याचप्रमाणे 96 ते 101 क्रमांकाच्या कंटेनमेंट झोन्सची पुनर्रचना व्हावयाची आहे.
सिंगरगुप्पी सौंदत्ती (झोन क्र. 95), वंटमुरी कॉलनी बेळगाव (क्र. 94), बैलहोंगल (क्र. 93), फुले गल्ली वडगांव (क्र. 92), लोकूर (क्र. 91), कागदल (क्र. 90) आणि कबलावी कित्तूर (क्र. 89) हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.