डेंग्यू बी ग्रुप आबोव्हायरस नावाच्या विषाणुमुळे होणारा व एडिस जातीच्या डासांमुळे प्रसारित होणारा विकार आहे. पहिले दोन तीन दिवस फक्त डोकं, अंग दुखतं. मग सणकून ताप येण्यास सुरुवात होते. अंगदु:खी, पाठदुखी, लालभडक डोळे, डोळ्यातून पाणी येणे, भूक मंदावणे, मळमळ, उलटी, श्वास व नाडी मंदावणे, थकवा, नैराश्य अशी लक्षणे जाणवू लागतात. ताप 7-8 दिवस येत राहतो. रक्तातील प्लेटलेट कमी झाल्यावर त्वचेतून रक्तस्त्रावासारखे लाल ठिपके दिसू लागतात. नाकातून रक्तस्त्राव होणे, शौचावाटे रक्त पडणे अशी लक्षणे आढळतात.
रक्त तपासणीमध्ये प्लेटलेट नावाच्या रक्त गोठवणार्या पेशींचे प्रमाण कमी झालेले तसेच इतर सफेद पेशी कमी झालेल्या आढळून येतात. ठराविक अॅटीबॉडीज वाढतात. उपचार लक्षणनुरुप केले जातात. गंभीर परिस्थितीत रुग्णाचे रक्त बदलावे लागते. (प्लाझमाफेरेसीस) क्वचीत रुग्णाचा मृत्यूही संभावतो.
चिकुनगुनीया : हा विकारही एडिस या डासापासूनच होतो. ताप, सांधेदुखी, लाल चट्टे उठून अंगावर खाज येणे असा त्रास होतो.
विषमज्वर, हिवताप (टायफॉईड व मलेरिया) : टायफॉईड व हिवताप हे देखील सूक्ष्मजंतुमुळे होणारे आजार आहेत. विषमज्वर दूषितपाणी व अन्नामुळे व हिवतापही डासांमुळेच होतो. कोणताही मुदतीचा ताप असल्यास ताबडतोब वैद्यकिय सल्ला घेणे योग्य असते. या आजारांवर अनेक उपचार उपलब्ध आहेत.
लेप्टोस्पायरोसीस : 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अस्मानी पावसामुळे या साथीचा उद्रेक झाला होता. उंदीर, कुत्री व मांजरांच्या लघवीतून हे जंतू पावसाच्या, सांडपाण्याच्या दूषित पाण्यात मिसळतात. माणसाला पायांच्या जखमा, त्वचेवरील भेगा यांचा संबंध जर अशा दूषित पाण्याशी आला तर लेप्टोस्पायरोसीसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बर्याच केसीसचे रिपोर्टिंगच होऊ शकत नाही. त्यामुळे जनसामान्य या माहितीपासून दूरच राहतात. शेतकरी, स्वच्छता कामगार, फिरते विक्रेते, उसाच्या फडात काम करणारे कामगार, गोठ्यात काम करणारे कामगार, डेअरीमध्ये काम करणारे, सुरक्षा सैनिक इ. ना याचा धोका जास्त असतो. मुदतीचा सणकून ताप येणे, काविळ होणे, किडनी फेल होणे, मेंदूला ताप चढणे असे होऊन जीवाला धोका संभवू शकतो. शारीरिक स्वच्छता, पावसाळ्यात गमबूट वापरणे इत्यादीमुळे प्रतिबंध करता येतो.
प्रतिबंध- सांडपाण्याचा, पावसाच्या पाण्याचा निचरा होणे खूप आवश्यक आहे. घरातील अडगळ कमी करून जंतुनाशके फवारून डासांच्या उत्पत्तीलाच अटकाव करावा. उकीरडे, प्लास्टिकचा कचरा, गटारी, डबकी यांची व्यवस्था लावणे हे
लेप्टोस्पायरोसीस : 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अस्मानी पावसामुळे या साथीचा उद्रेक झाला होता. उंदीर, कुत्री व मांजरांच्या लघवीतून हे जंतू पावसाच्या, सांडपाण्याच्या दूषित पाण्यात मिसळतात. माणसाला पायांच्या जखमा, त्वचेवरील भेगा यांचा संबंध जर अशा दूषित पाण्याशी आला तर लेप्टोस्पायरोसीसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बर्याच केसीसचे रिपोर्टिंगच होऊ शकत नाही. त्यामुळे जनसामान्य या माहितीपासून दूरच राहतात. शेतकरी, स्वच्छता कामगार, फिरते विक्रेते, उसाच्या फडात काम करणारे कामगार, गोठ्यात काम करणारे कामगार, डेअरीमध्ये काम करणारे, सुरक्षा सैनिक इ. ना याचा धोका जास्त असतो. मुदतीचा सणकून ताप येणे, काविळ होणे, किडनी फेल होणे, मेंदूला ताप चढणे असे होऊन जीवाला धोका संभवू शकतो. शारीरिक स्वच्छता, पावसाळ्यात गमबूट वापरणे इत्यादीमुळे प्रतिबंध करता येतो.
प्रतिबंध- सांडपाण्याचा, पावसाच्या पाण्याचा निचरा होणे खूप आवश्यक आहे. घरातील अडगळ कमी करून जंतुनाशके फवारून डासांच्या उत्पत्तीलाच अटकाव करावा. उकीरडे, प्लास्टिकचा कचरा, गटारी, डबकी यांची व्यवस्था लावणे हे महानगरपालिकेचे काम आहे. याबाबत नागरिकांनीच दक्ष राहिले पाहिजे. मच्छरदाणी वापरणे, पावसाळ्यात शक्यतो मगबूट वापरणे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ टाळणे, शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता हे साथीचे रोग टाळण्याचे मूलमंत्र आहेत. तरीही ताप आलाच तर फॅमिली डॉक्टरना दाखवून योग्य त्या रक्त लघवी तपासण्या करून घ्याव्यात.
चिकुनगुन्या : खबरदारी आवश्यक
या आजाराच्या नावात ‘चिकन’ नसून ‘चिकुन’ आहे. ‘चिकुनगुन्या’ हा आफ्रिकन भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ वाकडे चालणे असा आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सर्व सांधे आखडून येणे, अंग खूप दुखणे, कंबर दुखणे हे प्रकार होतात व रुग्ण वाकडा होऊन अंग आवळून चालतो म्हणून या आजाराला या अर्थाचे नाव दिलेले आहे.
चिकुनगुन्या’ हा आजार अल्फाव्हायरस जातीच्या एका विषाणुमुळे होतो. हा मलरिया व डेंग्युप्रमाणे डासांमार्फत पसरतो. हे डास ‘एडिस इजिप्ती’ या विशिष्ट प्रजातीचे आहेत. या डासांना त्यांच्या अंगावर पांढरे पट्टे असल्यामुळे सहज ओळखता येतात आणि महत्त्वाचे म्हणजे हे डास फक्त दिवसाच चावतात, रात्री चावत नाहीत. हे चिकुनगुन्याचे व्हायरस या डासांच्या शरीरात लागण झालेल्या रुग्णांकडून जातात व तेथेच वाढतात. असा डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
तसे पाहिल्यास फक्त डासांद्वारेच या साथीचा प्रसार होतो. परंतु या प्रसाराचा वेग पाहिल्यास हवे वाटे सुद्धा या रोगाची लागण होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्षणे : विषाणुयुक्त डास माणसाला चावल्यावर साधारणत: दोन ते बारा दिवसांमध्ये हा रोग होतो. तिसर्या दिवशी या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होते. अचानकच थंडी वाजून ताप भरतो. ही थंडी मलेरियासारखी खूप नसते. रुग्णांची कंबर व सांधे दुखतात, सुजतात इतके त्याला पलंगावरुनच काय खुर्चीवरुनही उठता, हलता येत नाही. गुडघे, घोटे, पायांची बोटे व पावले, मनगटे, हाताची बोटे, मान, खांदा, कंबर दुखायला लागतात. सांध्यावर सूज येते. ताप येऊन गेल्यावर अंगावर बारकी पुरळ येतात. खाज सुटते असे वाटावे की गोवर आला आहे.
www.drsonalisarnobat.com
काही रुग्णांना असे वाटते की, ही डॉक्टरी औषधामुळे आलेली रिअॅक्शन आहे. परंतु नसे नसून हे रोगाचेच एक लक्षण आहे. सांधेदुखी, ताप, अंगदुखी, पुर, फोड याबरोबरच काही रुग्णांना कानामागे, गळ्याकडे, जांघेत, छोट्या छोट्या गाठी येतात. दाबल्यावर दुखतात. काही रुग्णांना उलट्या, मळमळ, जुलाब होतात. कित्येक पेशंटना मात्र नाजूक त्वचेच्या ठिकाणी व्रणदेखील येतात.
एक गोष्ट मात्र नक्की की हा आजार जीवघेणा, घातक नाही. बरेच व्हायरल इन्फेक्शन आपोआप बरे होणारे असतात. परंतु हा रोग त्रासदायक मात्र बराच आहे.
उपचार : होमिओपॅथीमध्ये यावर खात्रीशीर इलाज व प्रतिबंधक औषध दोन्ही उपलब्ध आहेत.
प्रतिबंधक उपाय : प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. परंतु होमिओपॅथीक औषधांव्यतिरिक्त डासांच्या वाढीला प्रतिबंध करणे हाच मुख्य उपाय आहे. घराच्या आसपास सांडपाणी निचरा करणे, औषध फवारणी करणे, वैयक्तिक डास प्रतिबंध करणे हे उपाय आहेत. चिकुनगुन्याची शेकडो लोकांना लागण होत असताना सरकारी पातळीवर याची गंभीर दखल घेणे जरुरीचे आहे.
9964946918
9916106896
पावसाळ्यात होणारे विकार कोणकोणते आहेत त्यावर होमिओपथिक मध्ये काय उपचार आहेत?काय सांगतात बेळगावच्या प्रसिद्ध डॉ सोनाली…
Posted by Belgaum Live on Saturday, June 13, 2020