बेळगाव आणि परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साठले आहे.बेळगाव गोवा मार्गावर देखील खानापूर पासून पुढे पाऊस जोरात सुरू आहे.या मुसळधार पावसामुळे बेळगाव चोर्ला घाटात दरड कोसळली असून काही काळापासून वाहतूक ठप्प झाली आहे.दरड हटवण्यासाठी संबंधित खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोचले असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
चोरला घाटात दरड कोसळली आहे मंगळवारीच्या पावसाने लँड स्लाईड झाला आहे. काही काळासाठी बेळगाव गोवा चोरला घाटातून वहातुक ठप्पगोव्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
बेळगावहुन गोव्याला दररोज शेकडो वाहने भाजीपाला नेत असतात त्या भाजीवाहू वाहतुकीवर या दरडीचा परिणाम होऊ शकतो. सतत संतत धार सुरू असल्याने गोवा प्रशासनाला रोड वरील अडथळे काढण्यास अडचणी येत आहेत. दरड कोसळलेला व्हीडिओ पहा फक्त बेळगाव Live वर
चोरला घाटात कोसळली दरड-मंगळवारीच्या पावसाने कोसळली दरड-काही काळासाठी बेळगाव गोवा चोरला घाटातून वहातुक ठप्पगोव्यात…
Posted by Belgaum Live on Tuesday, June 16, 2020