मास्क न वापरल्यास आता 200 रुपये दंड!

0
 belgaum

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशानुसार राज्यातील सर्व महापालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क न वापरणाऱ्यांना जागेवरच 200 रुपयांचा दंड केला जाणार आहे.

बृहत बेंगलोर महानगरपालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून मास्क न वापरणाऱ्यांवर 1000 रुपये दंडात्मक कारवाईचा आदेश दिला होता. मात्र आता मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड करण्याचा आदेश देऊन शासनाने बेंगलोर महापालिकेला जणू चपराक दिली आहे.

bg

बेंगलोर सारखा प्रकार अन्यत्र होऊ नये यासाठी शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार राज्यातील महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणाऱ्यांना आणि सोशल डिस्टन्ससिंगचे उल्लंघन करणाऱ्यांना 200 रुपये तर महापालिका क्षेत्राबाहेर 100 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. कर्नाटक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी शासनातर्फे हा अध्यादेश जारी केला आहे.

विशेष म्हणजे उपनिरीक्षकावरील हुद्द्याचे पोलीस अधिकारी, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक, ग्रा. पं. विकास अधिकारी किंवा सरकारमान्य अन्य अधिकाऱ्यांनाच ही दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असणार आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.