Wednesday, April 24, 2024

/

मुचंडी गॅरेज जवळ अपघात राजस्थानचा तरुण ठार

 belgaum

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील  बेळगाव येथील मुचंडी गॅरेज जवळ वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरुण राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आले तर या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहेत.

ढोलाराम वय 21 राहणार भिनमाल जिल्हा जालोर राजस्थान असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील वाहन खाली कोसळून अपघात घडला.

ढोलाराम सह त्याचे आणखी पाच मित्र इनोव्हा वाहनातून राजस्थान कडे जात होते. मात्र बेळगाव येथील मुचंडी गॅरेज जवळ येतात वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील वाहन खाली उतरून अपघात घडला आहे.  जखमी अवस्थेत ढोलराम यास उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर इनोव्हा मधील अन्य पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत.

 belgaum

बेळगाव उत्तर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.