Saturday, April 27, 2024

/

गोकाक मध्ये मध्यरात्री बाजार सुरू

 belgaum

बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये आला असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस खाते दिवस रात्र एक करून प्रयत्न करत आहेत.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्यामुळे आरोग्य खात्यावर देखील प्रेशर येत आहे.असे असताना गोकाकमधील व्यापाऱ्यांनी मध्यरात्री दुकाने उघडून व्यापार सुरू केला आहे.

भाजीपाला विक्री देखील मध्यरात्री तीन पासून करण्यात येत आहे.व्यापारी मास्क न घालता व्यापार करत आहेत.अनेक ग्राहक देखील मास्क न घालता बेधडक खरेदी करत आहेत.सोशल डिस्टनसिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.मध्यरात्री लोकही खरेदीसाठी झुंबड करत आहेत.व्यापारी मध्यरात्री दुकाने उघडून नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत.

कोरोनाचा फैलाव वाढत असताना पोलीस आणि आरोग्य खाते अविरत प्रयत्न करत आहे.अशा परिस्थितीत मध्यरात्री दुकाने उघडून व्यापार करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखे होणार आहे.सिंधी खुट आणि मटण मार्केट परिसरात ही गर्दी होत आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.