Saturday, April 27, 2024

/

राज्यातील नव्या 178 रुग्णांपैकी तब्बल 157 महाराष्ट्र रिटर्न!

 belgaum

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 29 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 178 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,711 इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल 157 महाराष्ट्रातून आलेले “महाराष्ट्र रिटर्न” आहेत.

राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार काल गुरुवार सायंकाळी पाच वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 29 मे दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात 178 कोरोनाग्रस्त आढळून आले असून यामध्ये 111 पुरुष आणि 67 महिलांचा समावेश आहे. तसेच यापैकी सर्वाधिक म्हणजे 157 जण महाराष्ट्रातून आलेले नागरिक आहेत. आज दुपारपर्यंत आणखी 35 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 869 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 1,793 इतक्या असून आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

काल गुरुवार सायंकाळपासून राज्यात सर्वाधिक बाधित रुग्ण रायचूर (62) व यादगीर (60) या जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे कलबुर्गी व उडपी जिल्ह्यातील प्रत्येकी 15 रुग्णांसह बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, मंड्या, दावणगिरी, म्हैसूर, शिमोगा, चित्रदुर्ग, चिकबळ्ळापूर व धारवाड जिल्ह्यामध्ये उर्वरित कोरोनाबाधित सापडले आहेत.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.