संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. लॉक डाऊन परिस्थितीही गंभीर आहे. त्यामुळे शाळांना सर्वात आधी सुट्टी देण्यात आली होती. विशेष करून एलकेजी आणि यूकेजी प्रवेश प्रक्रिया बद्दल बाबत अजूनही पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र शिक्षण खात्याने याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे.
शाळा सुट्टी पडल्यानंतर सर्व पालकांना चिंता लागून राहते प्रवेशाची. मात्र यावर्षी कोरोनामुळे अनेक शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत. जोपर्यंत कोरोनावर मात करण्यात येत नाही तोपर्यंत कोणत्याही शाळा सुरू होऊ नयेत असा आदेश शिक्षण खात्याने दिला आहे. काही प्रमाणात कोरोना आटोक्यात येत असला तरी शिक्षण खात्याने मात्र अजूनही कोणतेही प्रवेश प्रक्रिया सुरू केली नसल्याचे दिसून येत आहे.
लहान मुलांवर कोणतेही संकट येऊ नये या दृष्टिकोनातून शिक्षण खात्याने एलकेजी युकेजी तसेच इतर शाळा प्रवेश प्रक्रिया स्थगित केले आहेत. दरम्यान ही प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत. याबाबत अधिकृत घोषणा नसली तरी तशा सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
एलकेजीसाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्यामुळे पालकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येणार असल्याचेही शिक्षण खात्याने सांगितले आहे. सध्या कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत तरी शाळांना सुट्टी असेल अशी माहिती मिळाली आहे. अजूनही दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या घेण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एलकेजी आणि यूकेजी बाबत ही अजून तरी स्पष्ट असे निर्देश देण्यात आले नसले तरी पालकांतून मात्र संभ्रमावस्था कायम आहे.