सोमवारी दुपारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावच्या जागेत एक कोरोना पोजिटिव्ह रुग्णाने वाढ झाली असून एकूण जागा 122 झाल्या आहेत. पी 2101 या दहा वर्षाच्या मुलगा कोरोना पोजिटिव्ह आला आहे.
दुसरीकडे राज्यात 69 नवीन कोरोना पोजिटिव्ह रुग्ण झाले असून राज्याचा आकडा 2158 वर पोहोचला आहे.
बेळगाव तालुक्यातील हंदीगनूर गावातील दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.हा मुलगा मुंबईहून आल्याची ट्रॅव्हल हिस्टरी आहे.
हंदीगनूर येथे एकूण चाळीस जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.त्यांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी आरोग्य खात्याने घेतले आहेत.आरोग्य खात्याच्या रिपोर्टमध्ये दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या मुलाला आता अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
क्वारंटाईन केलेल्या पैकी अजून तीस व्यक्तीचे तपासणीचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.एकूणच बेळगावात महाराष्ट्र कनेक्शनचे पोजिटिव्ह वाढत आहेत.