Wednesday, April 24, 2024

/

बेळगावातील परप्रांतीय कामगारांचाही प्रश्न मार्गी लागणार

 belgaum

बेळगावातील औद्योगिक वसाहतीत अनेक परराज्यातील कामगार अडकून पडले आहेत. संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे. मात्र नुकतीच केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे बेळगावातील परराज्यातील कामगारांचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव येथील उद्यमबाग मच्छे होनगा यासह आदी औद्योगिक वसाहतीमध्ये बिहार ओरिसा उत्तर प्रदेश आदी राज्यातून आलेले कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे परराज्यातील कामगारांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर बेळगाव येथून आता विशेष बस सेवा सुरू करून त्यांना गावी जाऊ देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे परराज्यातील कामगारांच्या चेहर्‍यावर हसूं म्हटले आहे.

लॉक डाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही संस्थाने मदत केली होती तर मच्छे येथील परराज्यातील कामगारांनी शेतात काय सापडेल ते खाऊन पोट भरून घेतले होते. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. ही परिस्थिती संपूर्ण देशात होती. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचे कामगार वर्गातून स्वागत होत आहे.

 belgaum

गेल्या अनेक दिवसापासून लॉक डाऊन’मुळे मजूर कामगार कर्मचारी विद्यार्थी पर्यटक प्रवासी आणि भाविक अनेक राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. बेळगावात ही तशीच परिस्थिती आहे. देशातील संपूर्ण वाहतूक बंद असल्याने त्यांच्यावर ही पाळी आली आहे. मात्र केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अनेकांना दिलासादायक ठरू लागला आहे. बेळगाव येथेही अनेक कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयात काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत. मात्र या सार्‍यांना टक्कर देत कामगार आपल्या गावी जाण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. बेळगावात ही याबाबतची मोहीम लवकरच राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

1 COMMENT

  1. नमस्कार मी प्रसाद निलजकर , मी बेळगाव येथील बिजगर्णि चा रहिवाशी आहे सध्या लोहगाव पुणे येथे आहे. मला बेळगाव ला येण्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.