उद्यमबाग येथील आठ वर्षाच्या मुलीचा उलट्या होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अश्विनी परशराम कालेरी (८) असे या मुलीचे नाव असून ती उद्यमबाग जवळील झोपडपट्टीत राहत होती.नैसर्गिक विधीसाठी जावून ती परत येत असताना तिला उलट्या सुरू झाल्या.
तिच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात दाखल केले पण उपचाराचा उपयोग झाला नाही.नैसर्गिक विधीसाठी गेली असताना विषारी किटकाने तिला दंश केला असावा किंवा खाण्यातून तिला विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उद्यमबाग पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे.उद्यमबाग सीपीआय दयानंद शेगुणशी तपास करत आहेत.