बेळगावात कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून आकडा दहा वरून 14 वर पोहोचला आहे.बेळगाव साठी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून धोक्याची घंटा वाजली आहे.
रविवारी दुपारी राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावात आणखी चार रुग्ण भर पडल्याची माहिती दिली आहे. आज नवीन पोजीटिव्ह रुग्ण हे रायबाग कुडचीचे असून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून याची बाधा झाली आहे तर हिरे बागेवाडीत आणखी एक रुग्ण वाढला आहे.
रायाबाग कुडची येथील 19 ,25 व 55 अश्या वयोगटातील पुरुषांना तर हिरेबागेवाडी येथील 38 वर्षाच्या पुरुषांला संपर्कातून कोरोनाची बाधा झाली आहे.चारही रुग्ण जिल्हा इस्पितळात दाखल आहेत.
कुडची रायबाग येथील रुग्णांची संख्या 4 वरून 7 अशी वाढली असून बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील संख्या 4 वरून 5 अशी झाली आहे.दिवसेंदिवस बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा वाढत असून बेळगावात जिल्ह्या या अगोदर रेड झोन मध्ये गेला आहे त्यामुळे सील डाऊन व्हायची शक्यता आहे.रविवारी पुन्हा दहा वरून हा आकडा 14 वर पोहोचल्याने पोलिसांनी लॉक डाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे