बेळगाव जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच आहे त्यामुळे आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे एकूण आकडा सतरा वर गेल्याने हा आकडा वाढू नये यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत सध्या वैद्यकीय सेवेला करो या मरो जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे यापुढे सुरक्षित अंतर ठेवून मात करण्यासाठी एकजुटीने लढूया असे आवाहन पालक मंत्री जगदीश शेट्टर यांनी केली आहे
सोमवारी शासकीय वस्तीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले आहे रायबाग येथे आढळून आलेल्या अधिक रुग्णांना मुळे भीती व्यक्त करण्यात आली आहे दिल्ली येथील निजामुद्दीन तबलीग धर्मसभेत जाऊन आल्यामुळेच संख्या वाढली आहे अजूनही बेळगावात संख्या वाढण्याची भीती आहे त्यामुळे कोरोना वाढीला रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे
ते म्हणाले की, “केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी आम्ही यापूर्वी चर्चा केली आहे. बेळगावमध्ये दोन दिवसांत प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्यता आहे. हिरेबागेवाडी, कुडची, बेळगुंदी आणि बेळगाव या क्षेत्रात आवश्यक त्या सुविधा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीतील तबलीग धार्मिक स्थळातून पडल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाला भेटण्याची प्रथा आहे मात्र त्याचा मोडीत काढून संबंधित जाऊन आलेल्यांची तपासणी करून त्यांना कोरंटाइन विभागात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे
हॉटेल किंवा मोरारजी देसाई निवासी शाळेत संक्रमित व्यक्तींशी प्राथमिक संपर्क असलेल्या व्यक्तींच्या प्लेसमेंटबाबत कोणत्याही गोंधळाला न जाता सर्व लोकांनी एकत्रितपणे समाजाच्या हितासाठी एकत्र काम केले पाहिजे. असेही रमेश जारकीहोळी यांनी सांगितले