Friday, April 26, 2024

/

बुधवारी भारत बंद असेल तरी बेळगाव बंद नाही

 belgaum

बुधवारी भारत बंदची घोषणा करण्यात आली असली तरी बेळगाव बंद नसून नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरळीत राहणार आहेत.सिटू ए आय सी टी यु संघटना बुधवारी आपल्या मागण्यासाठी शहरात मोर्चा काढणार आहेत.छत्रपती संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाला विविध कामगार संघटना सहभागी होणार आहेत.एसटी,अंगणवाडी आणि अन्य कर्मचारी मोर्चात सहभागी होणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर मोर्चाची सांगता होणार आहे.शाळा,कॉलेज,बससेवा,रिक्षा आणि दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.