सरकारी शाळेच्या स्वच्छतागृहात एका गर्भवती महिलेने तेथेच स्त्री अर्भकाला जलम देऊन तेथून पळ काढला होता.दि 28 डिसेंम्बर रोजी ही अथणी तालुक्यातील यककंची गावात ही घटना घडली होती. एगळी पोलिसांनी याची कसून चौकशी सुरू केली होती .
अखेर दहावीत शिकणाऱ्या एका गर्भवती मुलीनेच मुलीला जलम देऊन तेथेच सोडून पळ काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.शाळेतील एका नराधम शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीवर अत्याचार करत होता.त्यामुळे ती मुलगी गर्भवती राहिली होती.मुलगी गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिच्या घरच्यांना देखील या नराधम शिक्षकाने धमकी दिली होती.

दानाचे पवित्र कार्य करणारे म्हणजे शिक्षक अशीच त्यांची समाजात ओळख आहे पण या प्रतिमेला एका शिक्षकाने काळिमा फासला आहे.शाळेतील विद्यार्थीनीवर शाळेतच अत्याचार करून तिला याविषयी कोणाला सांगितलीस तर तुझा खून करतो अशी धमकी या शिक्षकाने दिली होती.
या संदर्भात शिक्षकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ऐगळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून नराधम शिक्षकाला हिंडलगा जेलला पाठवण्यात आले आहे.