Friday, April 19, 2024

/

चव्हाट गल्लीत युवकांवर चाकू हल्ला

 belgaum

ज्योतीनगर येथील एका युवकावर चाकु हल्ला झाला आहे. बुधवारी रात्री चव्हाट गल्ली येथे ही घटना घडली असून या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आनंद सहदेव पुजारी (वय 30) असे त्याचे नाव आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली असून त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. हा हल्ला कोणी व कशासाठी केला? याचा तपास करण्यात येत आहे.

दोघेही दारू पिलेले होते नशेत भांडण झाले भांडणातून त्याच्या मित्रानेच पुजारी वर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.