Thursday, April 18, 2024

/

लक्ष्मण सवदी यांना असा दिलासा…

 belgaum

शिवाजी नगरचे आमदार रिझवान अर्षद यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना दिलासा मिळाला आहे.लक्ष्मण सवदी यांनी उप मुख्यमंत्रीपद स्वीकारल्या पासून दोनपैकी एका सदनाचे सदस्य होणे आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 17 ही विधान परिषद निवडणुकीसाठी तारीख नक्की केली आहे.लक्ष्मण सवदी यांना फेब्रुवारी 26 पूर्वी कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे आवश्यक आहे.रिझवान अर्षद हे निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्यांची मुदत जून 2022 पर्यंत होती पण आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

 belgaum

कारण एक व्यक्ती दोन्ही सभागृहाचे सदस्य राहू शकत नाहीत.विधान परिषद पोट निवडणुकीसाठी लक्ष्मण सवदी यांचे नाव जवळजवळ निश्चित आहे.फेब्रुवारी 17 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत विधान परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.