Friday, April 19, 2024

/

एपीएमसीत रिटेल भाजी विक्री नको

 belgaum

ए पी एम सी व्होलसेल भाजी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी रिटेल भाजी विक्री करू नये अशी मागणी शहरात रस्त्या शेजारी किरकोळ भाजी विक्रेत्या महिलांनी केली आहे.

बुधवारी सकाळी ए पी एम सी सेक्रेटरी  डॉ कुरी गौडा यांना भेटून त्यांनी ही मागणी केली आहे. ए पी एम सी च्या व्होलसेल भाजी मार्केट मध्ये किरकोळ भाजी विक्री करायला परवानगी देऊ नये व्होलसेल मध्ये रिटेल विक्रीचा फटका आम्हाला बसत आहे अशी देखील त्यांनी विनंती केली आहे.

Apmc mahila
Apmc

सध्या एक किलो दोन किलो अशी एपीएमसी व्होलसेल भाजी मार्केट मध्ये विक्री सुरू आहे याचा फटका शहरात किरकोळ विक्री करणाऱ्या वर होत आहे यापूर्वी किल्ला भाजी मार्केट मध्ये असे होत नव्हते असे देखील त्या भाजी विक्रेत्या महिलांनी म्हटले आहे.

 belgaum

ए पी एम सी सचिवांनी सदर महिलांना ए पी एम सी मध्ये विक्री साठी जागा उपलब्ध करून देऊ रस्त्याएवजी तुम्ही मार्केट यार्डात या असे सांगितले त्यावर मनपाने रस्त्यावर भाजी विक्री करीत रीतसर परवाने दिले आहेत शहरात विविध ठिकाणी बसून भाजी विक्री करतो त्यामुळे एकाच बसून विकणे सोयीचे होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावर ए पी एम सी अध्यक्षाना सांगून किरकोळ भाजी विक्री बंद करू असे आश्वासन या महिलांना मिळाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.