Thursday, April 18, 2024

/

घरगुती गॅस जोडणी : एजन्सीजवर कारवाईची शिफारस

 belgaum

मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांचे उल्लंघन शहरातील गॅस एजन्सीजकडून होत असल्याची बाब बेळगाव महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून संबंधित गॅस एजन्सीच्या विरोधात अन्न व नागरी पुरवठा खाते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची शिफारस केली आहे.

महापालिकेच्या 24.10 टक्के, 7.25 टक्के आणि 3 टक्के राखीव अनुदान अंतर्गत बीपीएल रेशन कार्डधारकांना घरगुती गॅस जोडणी करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. तसेच संबंधित विभागातील गॅस एजन्सी कंपन्यांमार्फत निवड झालेल्या लाभार्थींना घरगुती गॅस जोडण्या करून दिल्या जातात. मात्र सध्या संबंधित गॅस एजन्सीजनी महापालिकेकडे आपले मागील बिल थकीत असल्याचे कारण पुढे करून गॅस जोडणीचे काम करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे सुरू केली आहे. राखीव अनुदाना अंतर्गत गॅस जोडणी करून देण्यासाठी महापालिकेने 187 बीपीएल रेशन कार्डधारकांची निवड केली आहे. यापैकी 137 लाभार्थींची मागासवर्गीय आणि 50 लाभार्थ्यांची अल्पसंख्यांक राखीवतेनुसार निवड केली गेली आहे.

महापालिकेकडून या सर्व 187 पात्र लाभार्थींना गेल्या 8 जून 2019 रोजी गॅस जोडणी चे पत्र देण्यात आले होते तसेच त्यांना गॅस जोडणी करून देण्याची सूचना गॅस एजन्सी जना केली होती तथापि अद्यापपर्यंत गॅस जोडणी करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच गॅस जोडणी लवकरात लवकर करून दिली जावी, या मागणीसाठी नागरिकांना महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आता यासर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन महापालिका प्रशासनाने घरगुती गॅस जोडणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची शिफारस अन्न व नागरी पुरवठा खाते व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.