बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सचित झाला आहे. यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी आणि काही अधिकाऱ्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्मार्ट सिटीचा मोठा गाजावाजा झाला. मात्र विकासाच्या दृष्टीने अजूनही बेळगाव मागासलेलेच आहे यात काही शंका नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीत समावेश झाला पण विकासाचे काय असा प्रश्न सर्वसामान्य तुन विचारला जात आहे.
भारतात हे अभियान आखताना उपलब्ध व्यवस्थेचा विचार करून ज्या शहरांमध्ये दर्जात्मक जीवनपद्धती स्वच्छ वातावरण आणि विकासत्मक तेला वाव मिळू शकणाऱ्या शहरांना स्मार्ट बनविण्याचे मिशन केंद्र सरकारने आपले होते. मात्र मात्र सध्या शहराचा विकास पाहता स्मार्ट सिटीचा गाजावाजा करण्यापेक्षा विकासावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे तरी प्रशासन अधिकारी सुधारणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विकसनशील शहरांना एक मॉडेल ठरावे असेच काहीसे स्मार्ट शहर बनविण्याचा उद्देश हाती घेण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक राज्याला प्राधान्य देऊन सर्वसाधारणपणे प्रत्येक राज्यात दोन ते सहा शहरांचा अंतर्भाव या मोहिमेत राबविण्यात आला आहे. मात्र बेळगावच्या दृष्टीने स्मार्ट शहर आणि स्मार्ट योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे विकासाचे गाजर दाखवून भकासिकरण करण्याचा प्रयत्न सध्या स्मार्ट सिटीच्या योजनेतून सुरू झाला असून अनेक कामे अर्धवट पडून असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. याचा विचार करून यापुढे तरी विकासाला प्राधान्य द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्मार्ट सिटीही एक संकल्पना आहे. ती प्रत्येक देशात आणि प्रत्येक शहरात वेगवेगळी ठरू शकते वेगवेगळ्या माणसांसाठी आवश्यक वेगवेगळ्या गोष्टींची उपलब्ध असे या मोहिमेबद्दल सांगता येईल. ही योजना महत्त्वाची ठरत असली तरी बेळगाव शहरात मात्र याचा घोळ सुरू आहे. विकासाच्या नावाखाली अनेक अनागोंदी कारभार या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे विकासाचे गाजर दाखवून अनेकांना दिशाभूल करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता विकासाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. यापुढे तरी नागरिकांची दिशाभूल न करता केवळ आणि केवळ विकासावर भर द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे.