Friday, March 29, 2024

/

आर टी ओ सर्कल दगडफेक प्रकरणी तिघे अटकेत

 belgaum

केंद्र सरकारने जारी केलेल्या नागरिकता कायदा विधेयकाला विरोध करण्यासाठी बेळगावातील मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आर टी ओ सर्कल जवळ झालेल्या दगडफेकीला जबाबदार तिघा युवकांना अटक करण्यात आली आहे.

मार्केट पोलिसांनी कारवाई करत करत दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Stone pelting arrest
Stone pelting arrest

त्रिवेणी हॉटेल जवळील ए टी एम वर दगड फेकल्या प्रकरणी झुल्फिकार मोहम्मद हयात हकीम यांना तर आर टी ओ जवळील राज्य परिवाहन मंडळाच्या दोन बस इतर वाहनांवर दगड फेकल्या प्रकरणी वसीम अहमद मोकाशी आणि अमानुल्ल देवलापूर यांना अटक केली आहे.आरोपींवर सार्वजनिक ठिकाणी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत

 belgaum

मंगळवारी दुपारी ही दगडफेक झाली होती त्या नंतर आर टी ओ सर्कल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.