Thursday, March 28, 2024

/

पोट निवडणुकीनंतर भाजप सरकार गडगडणार का?

 belgaum

भाजपा नेतृत्वाखालील बी एस येडीयुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पोटनिवडणुकीनंतर कोसळणार असल्याचे भाकीत अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी व्यक्त केले असले तरी हे सरकार वाचवण्यासाठी निधर्मी जनता धावून येईल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केले आहे. अर्थात यावेळी निधर्मी जनता दलाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्रातील महा नाट्यनंतर कर्नाटकात निजद काँग्रेस पुन्हा एकत्र येतील असे वक्तव्य उभय बाजूचे नेते करीत आहेत मात्र उभयतांच्या युतीसाठी विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आड येणार आहे मात्र सध्या तशी तरी तसा कोणताच विचार नसल्याचे स्पष्ट करून जनता दलाचे वरिष्ठ नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी फेटाळून लावला आहे.एकूणच कर्नाटकात निजदला नव्याने निवडणुका नको असून त्या टाळणे अधिक उचित.

येत्या पाच डिसेंबर रोजी कर्नाटकात 15 जागासाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळण्याची शक्यता दुरावल्यांने मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता अधिक बळावल्याचे चित्र दिसते.भाजपने अपात्र उमेदवाराना तिकिटं दिल्याने सर्वत्र या उमेदवारां विषयी विरोधात जनमत तयार झाले आहे.या पोट निवडणुकीत अपात्र उमेदवाराना चांगला धडा शिकवण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे त्यांचा कानोसा घेतल्या नंतर दिसतो त्यामुळे राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते चिंतेत आहेत याचा भाजप नेतृत्वाने कास्ट कार्डचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे.खुद्द बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी लिंगायत मतदारांना आपली मते भाजपच्या पारड्यात टाकण्याचे आवाहन केले आहे.निकडणूक आयोगाच्या मार्ग सूचनेप्रमाणे निवडणुकीत कोणीही जात धर्माच्या नावे मतदारांना मत याचना करू नये असे बंधनकारक असताना नियम धाब्यावर बसवून मते मागितली जात आहेत त्या विरुद्ध आता राज्य काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे.

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अथणी व कागवाड या दोन विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुका होत आहेत तर गोकाक तालुक्यातील गोकाक विधान मतदारसंघात देखील पोट निवडणूक होत आहे.अथणी सीमेवर असल्याने या भागावर शेजारील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा परिणाम जाणवतो त्यामुळे यावेळचे निकाल हे धक्का देणारे ठरणार आहेत सर्वत्र भाजप काँग्रेस व जनता दल अशी तिरंगी लढत असली तरी त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता होताना दिसते.भाजपची मतदात बहुसंख्य लिंगायत मतदारांवर असून काँग्रेसने अल्पसंख्याक व मागास मतदारावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.प्रचारासाठी मुख्यमंत्री बी एस येडीयुरपप्पा यांनी बाजी मारली असून त्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा क्रमांक लागतो.कुमार स्वामी यांनी तर गोकाक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश जारकीहोळी यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने गोकाक मध्येच तळ ठोकला आहे.जारकीहोळी यांच्या राजकारणाला मतदार कंटाळले असल्याचे बोलले जाते तर रमेश जारकीहोळी यांना शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा न केल्याने फार मोठी नाचक्की झाली आहे.त्यांचे बंधू माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी तर रमेश जारकीहोळी यांच्या विरुद्ध टीकेची झोड उठवली आहे.रमेश जारकीहोळी यांच्या विरुद्ध काँग्रेसने लखन जारकीहोळी यांना उभे केले आहे त्याचा लाभ निजद चे उमेदवार अशोक पुजारी यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशोक पुजारी हे लिंगायत आहेत या मतदारसंघातुन त्यांनी दोन वेळा लढत दिली होती.भाजपच्या नेत्यांनी अशोक पुजारी यांच्या उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता तर खासदार प्रभाकर कोरे यांनी यशस्वी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याला यश आले नाही.

महाराष्ट्रातील सत्ता भाजपने गमावल्याने कर्नाटकातील भाजपाचे सत्ता टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केंद्रीय नेतृत्वासह राज्यातील नेत्यांनी चालवले आहेत मात्र मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याने व राज्यातील महापूर्व आलेली प्रचंड नुकसान याकडे केंद्रीय नेतृत्वाने पाठ फिरवल्याची चर्चा प्रकर्षणाने होताना दिसते. केंद्र सरकार कडून राज्याला पुरेसा निधी दिला नसल्याचा आरोप सर्वत्र उघडपणे होताना दिसतो त्यामुळे त्याचा फटका पोट निवडणुकीत भाजपला बसणार आहे.केंद्रातील भाजपचे सरकार कर्नाटकाला विशेष पॅकेज देईल या अपेक्षेत राज्य नेतृत्व होते मात्र ते न मिळाल्याने कर्नाटकात भाजप विषयी मोठी नाराजी व्यक्त होताना दिसते.

प्रशांत बर्डे-,जेष्ठ पत्रकार बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.