Sunday, September 1, 2024

/

‘किल्ला भाजी मार्केट व्यापाऱ्याची न्यायासाठी पी एम ओ कडे तक्रार’

 belgaum

कॅटोंमेंट किल्ला भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांने न्याय मिळवून देण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं असून त्याने केलेल्या तक्रारींची पी एम ओ कडून दखल देखील घेण्यात आली आहे.पी एम ओ ने पत्र मार्केट पोलिसांना याबाबत विचारणा करा असे पत्र लिहिले आहे याबाबत मार्केट पोलिसांनी पीडित भाजी व्यापारी तरुणाला चौकशी साठी पोलीस स्थानकात बोलावले होते.मंगळवारी सायंकाळी जय किसान भाजी मार्केट व्यापारी असोसिएशनच्या शेकडो व्यापाऱ्यांनी मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांची भेट घेऊन न्याय द्या अशी मागणी केली.

कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मधील व्यापारी लक्ष्मण शिवाजी राजगोळकर यांनी एपीएमसी मध्ये सुरू असलेल्या भाजी मार्केटबद्दल थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे तक्रार करत तीनशे व्यापाऱ्यांना न्याय द्या असे साकडे पंतप्रधान कार्यालयाला घातले होते. किल्ला भाजी मार्केट ए पी एम सी त स्थलांतर झाले मात्र सहा महिने झाले तरी अद्याप ना किल्ला ना ए पी एम सी कुठंच दुकान मिळाला नसल्याचा आरोप केलाय.

Killa vegetable merchants
Killa vegetable merchants

नव्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना दुकाने मिळाली नसल्याने तीनशे कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.पोलिसी बळाचा आणि राजकीय दबावाचा वापर करून कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट एपीएमसी मध्ये हलविण्यात आले आहे.भाजपचे दोन आमदार,एक खासदार आहेत पण त्यांनी कोणतीही मदत केली नाही.केवळ मते मागण्यासाठी ते येतात असा आरोपही राजगोळकर यांनी केला आहे.

गांधीनगर येथे भाजी व्यापाऱ्यांनी नवे मार्केट बांधण्यास प्रारंभ केला आहे. तीस टक्के कामही पूर्ण झाले आहे पण काही कायदेशीर बाबी आणि आर्थिक बाबीमुळे हे काम थांबले आहे.एपीएमसी मध्ये सगळ्या दुकानदारांना दुकाने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण काही व्यापाऱ्यांनाच तेथे दुकाने मिळाली आहेत.त्यामुळे इतर व्यापारी दुकान नसल्यामुळे अडचणीत आले आहेत.भाजी मार्केट हलवल्यामुळे तीन व्यापाऱ्यांना धक्का बसून त्याचे निधन झाले आहे.तीनशे व्यापाऱ्यांचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे तुम्ही या घटनेची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा असे मेणसे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

किल्ला भाजी मार्केट मधील ए पी एम सीत स्थलांतरित झालेले व्यापारी न्याय मिळवून घेण्यासाठी अनेक ठिकाणी पायऱ्या झिजवताना दिसत आहेत मात्र गेल्या कित्येक दिवसा पासून ए पी एम सी प्रशासनाला त्यांना समाधान करण्यात अपयश आलंय हे पी एम ओ कडे केलेल्या तक्रारी वरून सिद्ध झाले आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.