दि.18 तारखेला रात्री नऊ वाजल्यापासून 21 तारखेला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बेळगाव शहर आणि तालुक्यात पोलीस आयुक्तांनी 144 कलमा द्वारे प्रतिबंधात्मक आदेश बजावला आहे.
नागरिक सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात काही संघटना मोर्चा काढण्याची शक्यता आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुुमार यांनी सदर आदेश बजावला आहे.
या जमाव बंदीच्या आदेशामुळे आता नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा किंवा विरोध म्हणून कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा काढता येणार नाही.या जमाव बंदीच्या काळात चार हुन अधिक जण एकत्र देखील येता येणार नाही.
या जमाव बंदीच्या काळात बेळगाव शहरातील अति संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार आहे.शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी वरील निर्णय घेतला आहे.मात्र या काळात शहरातील शांतता भंग होऊ नये यासाठी कुणीही अफवा पसरवणारे संदेश पाठवू नयेत असेही आवाहन पोलिसांनी केलं आहे .