जुन्या धारवाड रोड छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुला खालील रेणुका देवी मंदिरातील जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास करत डल्ला मारला आहे.शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून देवीचे सोन्याचे मंगळसूत्र,चांदीचा किरीट,चांदीची चवर आदी दागिने चोरले आहेत चोरीचा प्रकार कुणालाही कळू नये म्हणून सी सी टी व्ही हार्ड डिस्क व कॅमेरे देखील पळवले आहे.
सकाळी ही घटना उघडकीस येताच मार्केट पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.मंदिराला भेट देऊन मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी तपास चालवला आहे.शहरात जुन्या पी बी रोड वर उड्डाण पुलाखाली रात्री वर्दळ कमी असते हे हेरून चोरट्यांनी रेणुका देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे मार्केट पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.