belgaum

रॉयस्टन गोम्स मेमोरियल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने सेंट मेरीजचा तर सेंट झेव्हीयर्स शाळेने हेरवाडकर शाळेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.रविवारी 24 रोजी दुपारी 2 वाजता रॉयस्ट्स कप साठी पॉल आणि झेव्हीयर्स या दोन संघात जेते पदासाठी लढत होणार आहे.

bg

शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात सेंट पॉलनेसेंट मेरी शाळेचा 3-0 अश्या गोल फरकाने पराभव केला. नवीन भागवती,अथर्व बिडीये आणि विहान किटवाडकर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेव्हीयर्स संघाने देखील एम व्ही हेरवाडकर शाळेचा 3-0 गोल फरकाने पराभव केला.झेव्हीयर्स तर्फे रेहान किल्लेदार पंकज अनीगोलकर, स्पर्श देसाई यांनी गोल केले.

दोन्ही उपांत्य सामने एकतर्फी झाले .आता रविवारी झेव्हीयर्स की पॉल याचा फैसला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.