Friday, April 19, 2024

/

शारदामाता स्वाधारगृहात साजरी केली दिपावली

 belgaum

प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा सण म्हणजे दिपावली…आम्ही प्रत्येकजण हा सण आपल्या कुटुंबियांसमवेत मोठया उत्साहात साजरा करत असतो.पण जे गरीब लोक किंवा जे आश्रमात राहून आपले आयुष्य व्यतीत करतात त्यांच्या आयुष्यात दिवाळी दसरा कधी नसतोच…त्यांची फक्त दोन वेळच खाणं आणि रहायला जागा अशी जगण्यासाठीची धडपड चालू असते.
अशाच महिला आणि त्यांच्या मुलांच्या जगण्याचा आधार बनलेल्या शाहूनगर येथील शारदा माता स्वाधारगृहात जाऊन दिवाळी साजरी केली आहे बेळगाव येथील जायंट्स मेन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी.

Giants main
Giants main

फराळाचे साहित्य,सुगंधित तेल,उटणे, साबण,चॉकलेट्स यांचे वाटप या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. शाहूनगर दुर्गामाता गल्ली येथील या स्वाधार केंद्रात रहाणाऱ्या निराधार महिलांना दिवाळी साजरी करण्यास मदत केल्याने खऱ्या अर्थाने हा सण साजरा केल्याचे समाधान जायंट्सच्या सदस्यांना मिळाले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, आर.एम.चौगुले, गावडू पाटील,रमेश भादवनकर, अजय तुपारे यांचे सहकार्य लाभले.यावेळी स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर, फेडरेशन संचालक मदन बामणे, अध्यक्ष सुनिल भोसले,सचिव प्रदिप चव्हाण, संचालक राहुल बेलवलकर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.