दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला घरच्या बिकट परिस्थितीमुळे शाळा सोडून घरची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आलेल्या बेक्कीनकेरे येथील रितूला मदतीचे हात मिळत आहेत.युवा समितीच्या माध्यमातून रितूला शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली आहे.
बेळगाव Live ने सोमवारी दुपारी ‘शाळा सोडलेल्या रितूला गरज आहे दानशूरांच्या मदतीची’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती बातमी घातलेल्या अवघ्या तासांतच त्याची दखल घेत युवा समितीने शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे.
“सेवेशी ठाई तत्पर*युवा समिती निरंतर” यातुन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने त्या पीडित कुटुंबाला त्या परिवाराला शैक्षणिक साहित्य कपडे आणि इतर गरजू साहित्य दिल.
युवा समितीच्या वतीने शिक्षण न सोडण्याचा आणि सर्वोतोपरी मदत करण्याचे सांगण्यात आले.
याचवेळी शिक्षण अधिकारी , प्रशासनाला भेटून या कुटुंबाला मदत पुरवावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, चिटणीस किशोर मराठे, सुरज कुडूचकर आणि इतर उपस्थित होते.
अशी आहे रितूच्या कुटुंबाची अवस्था
रितू पाटील (१६) राहणार बेकीनकेरे पीडित विद्यार्थिनींचे नाव आहे तिची आई लक्ष्मी आणि वडील एकनाथ पाटील यांच्यात मतभेद झाल्यामुळे आईने पतीचे घर सोडून माहेर गाठले.माहेरी बेकीनकेरे येथे लक्ष्मी रितू, रोहिदास (१५) आणि रोहिणी या मुलासमवेत आपल्या माहेरी आई,वडिलांकडे राहत होती.वडील यल्लप्पा सावंत आणि आई शांता हे त्यांचा सांभाळ करत होते.पण नैराश्य आणि ताण तणावामुळे लक्ष्मी आजारी पडली आणि तिचे २०१२ मध्ये निधन झाले.त्यानंतर देखील आजी,आजोबांनी आपल्या तीन नातवंडाचा सांभाळ केला.
त्यांची शाळा ,अभ्यास व्यवस्थित चालला होता पण दैवाला हे पाहवले नसावे.त्यांच्या आजीचे ऑगस्ट महिन्यात निधन झाले आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आजीचे निधन झाल्यामुळे रितूच्या खांद्यावर घरची जबाबदारी पडली.लहान भाऊ , बहीण आणि सत्तर वर्षाच्या वृद्ध आजोबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर आली.त्यामुळे तिला शाळा सोडायला लागली.त्यामुळे रितू घरात स्वयंपाक करणे,धुणी भांडी करणे आणि बहीण ,भावाला तयार करून शाळेला पाठवणे या कामात गुंतली आहे.त्यांचे राहते घर देखील मुसळधार पावसामुळे पडले असून ग्राम पंचायतीने त्याचा अहवाल पाठवला आहे.तिच्या आजोबांची अडीच एकर शेती आहे पण तेथे पाणी नाही.आजोबांना एक हजार पेन्शन मिळते आणि अन्न भाग्य योजनेतून धान्य मिळते त्यावर त्यांची गुजराण चालली आहे.