Saturday, December 28, 2024

/

मध्यवर्ती समिती बाळगणार पवारां प्रतीची बांधीलकी

 belgaum

सीमावासीयांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे आणि सीमावासियांना नेहमीच पाठबळ देणारे शरद पवार यांच्या प्रतीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी दहा वाजता धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे .
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शरद पवार सीमावासीय जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत 1986साली झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते .त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठबळ देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मध्यवर्ती समितीने ठरवले आहे.

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक तुकाराम बँकेच्या सभागृहात झाली अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे आर के पाटील महेश जुवेकर रावजी पाटील सुनील आनंदाचे विकास कलघटगी मारुती मरगानाचे प्रकाशबापू पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.