Saturday, April 27, 2024

/

बेळगाव कोल्हापूर वाहतूक बंद-जिल्ह्यात हाय अलर्ट

 belgaum

महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका बसून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे बंगळूर महामार्गावर दरड कोसळल्याने बेळगाव ते कोल्हापूर वाहतूक बंद झाली आहे.
निपाणी नजीक महामार्ग रोखला गेला असून कुणीही या मार्गावर उद्या दुपारपर्यंत प्रवास करू नये असे आवाहन आयजीपी राघवेन्द्र सुहास यांनी केले आहे.

वाहतूक रोखण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील धरणे पूर्णपणे भरली आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्व नद्यांनी आपल्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर्ण बेळगाव जिल्ह्याला हाय अलर्ट देण्यात आला आहे राहत बचाव कार्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबर दिले आहेत त्या ठिकाणी कधीही फोन करून माहिती घेऊ शकता.

DC’s office, Belgaum – 0831-2407290, SP’s office – 0831-2405231
Chikkodi tahsildar’s office – 08338-272228
Raibag tahsildar’s office – 08331-225482
Athani tahsildar’s office – 08289-251146
Nippani tahsildar’s office – 08338-220395.

 belgaum

कोयना धरण क्षेत्रात ५ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ९ वाजता
2159.00 फूट पाणी जमले आहे. हे एकूण 100.66 टीएमसी असून कोयनेचे दरवाजे साडे चौदा फुटावर स्थिर आहेत.
धरणातून नदीपात्रात 1 लाख 3 हजार 600 कूसेस्क्स विसर्ग असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक -1 लाख 17 हजार कूसेस्क्स इतकी असल्याची माहिती हाती आली आहे.

*सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाण्याचा विसर्ग रात्री 9 वाजता*

*5/8/19*

*(क्युसेक्स मध्ये )*

*कोयना – 103600*
*कृष्णा – धोम – 20508*
*वेण्णा – कण्हेर 13366*
*उरमोडी – 8724*
*तारळी – 8072*
*वीर – 99475*

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.