Thursday, April 18, 2024

/

कपिलेश्वर जुने तलाव स्वच्छतेचे काम सुरू

 belgaum

पवित्र तीर्थ मानले जाणाऱ्या कपिलेश्वर तलावामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सांडपाणी मिसळले.परिणामी संपूर्ण तलावतील पाणी दूषित झाले. सदर पाण्यातच गणपती विसर्जन करण्याची वेळ गणेश भक्तांवर आली होती. मात्र सदर घटनेची दखल घेत मनपाकडून विसर्जन तलावाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दूषित पाणी मोटारच्या सहाय्याने उपसण्याचे काम सुरू असून त्या भागातील ड्रेनेज वाहिन्या देखील स्वच्छ केल्या जात आहेत.

ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने सदर दूषित पाणी कपिलेश्वर तलावात मिसळले आहे. गटारीचे पाणी तलावात मिसळत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच पर्यायी व्यवस्था देखील करण्याची गरज निर्माण झाली आहे सदर भागातील ड्रेनेजवाहिन्या सातत्याने तुंबत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.यामुळे ड्रेनेजवाहिन्यांवर सीडी वर्क करून देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते.मात्र सदर काम अजूनही तसेच पडून असून परिणामी ऐन गणेशोत्सव च्या काळात गणपती विसर्जन करत असताना कपिलेश्वर तलावात गटारीचे पाणी मिसळले आहे.

प्रामुख्याने कपिलेश्वर तलावात गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात केले जाते.मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जन करत असताना तलाव अपुरा पडत आहे.यामुळे त्या ठिकाणी नवीन कपिल तीर्थ तलाव देखील बांधण्यात आला. मात्र तरीदेखील ड्रेनेज वाहिन्यांच्या कामाचे जुने दुखणे सातत्याने डोके वर काढत असून जोरदार पावसामुळे गणेशोत्सवात ड्रीनेजKapileshwar tank वाहिन्या तुंबून कपिल तीर्थ तलाव दूषित बनला आहे.यामुळे जुन्या कपिलेश्वर तलावाच्या परीसरात असलेल्या मनपाच्या जागेचा वापर करून सदर जुना कपिलेश्वर तलाव मोठा करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

 belgaum

मंगळवारी घडलेल्या घटनेची दखल घेत बुधवारी सदर तलावाचे स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले याबरोबरच तलावाच्या समोरील ड्रेनेज वाहिन्या देखील स्वच्छ करण्यात येत आहेत मात्र जुने दुखणे सातत्याने वर येत असून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे बनले आहे.गणेश विसर्जनात जोरदार पावसाने हजेरी लावली तर सदर घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून पर्यायी व्यवस्था गरजेची असल्याचे मत गणेश भक्तांमधून होत व्यक्त होत आहे.

सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्याने पाणी ओवरफ्लो होऊन रस्त्यावर येणे हे सातत्याने होतच असते मात्र ईश्वर तलावात ते दूषित पाणी मिसळल्याने गणेश भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तर दुसऱ्या बाजूला नवीन कपिलेश्वर तलावात मात्र पाणीच नव्हते. गणपती विसर्जन करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.मात्र सदर भागातील नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी या बाबीची दखल घेत संबंधितांशी संपर्क साधून स्वता थांबून नवीन तलावामध्ये पाणी भरण्याबाबत सांगित पाठपुरावा केला.दरम्यान भाजप नेते किरण जाधव आणि मध्यवर्ती गणेश महामंडळाचे गणेश दद्दीकर विकास कलघटगी आणि कपिलेश्वर मंदिर कमिटीनेही रात्रीचं पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.