कॅन्टोन्मेंट येथील भाजी मार्केट चे स्थलांतर एपीएमसी मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार दि 14 पासून सर्व होलसेल भाजी व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार सुरू करण्याचा आदेश एपीएमसी ने दिला आहे.आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत भाजी मार्केट चे सदस्य आणि एपीएमसी चे सर्व मंडळ उपस्थित होते.
एपीएमसी सेक्रेटरी एस गुरुप्रसाद यांनी 14 तारखे पासून भाजी मार्केट एपीएमसी मध्ये हलवण्याची सूचना केली. भाजी मार्केटचे राम हावळ व इतरांनी यावर आक्षेप घेतले. आम्ही 230 व्यापारी आहोत आणि एपीएमसीत फक्त 130 दुकाने आहेत, तेथे व्यवहार कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आम्हाला ही दुकाने पुरत नाहीत ही बाजू मांडण्यात आली.
कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये 114 दुकानात 230 जण मावता. आता तुमच्या पैकी 100 जणांनी आधीच दुकाने घेतलेली आहेत, प्रश्न आता फक्त 130 जणांचा आहे. निविदा काढल्या तेंव्हा दुकाने का घेतला नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला असून आपण कायदा पाळून बंद करावा, आम्ही 14 पासून आदेशाची अंमलबजावणी करणार अशी माहिती एसीपी एन व्ही बरमनी यांनी दिली.
आता सोमवारी कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट मध्ये शेवटचा बाजार होण्याची शक्यता असून मंगळवारी पासून बाजार एपीएमसी मध्ये भरणार आहे.मार्केट ए सी पी एन व्ही बरमनी, मार्केट व ए पी एम सी पोलीस निरीक्षक,ए पी एम सी अध्यक्ष आनंद पाटील,यांच्या सह सर्व सदस्य, भाजी मार्केट व्यापारी ए पी एम सी मार्केट यार्ड व्यापारी उपस्थित होते.