भारतीय लष्करी सेवांचा आणि यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंकेचे नाविक दल भारतात आले असून मंगळवारी यापैकी एक तुकडी बेळगावला आली आहे. येथील ज्युनिअर लिडर्स विंग ला भेट देऊन तेथे शिकवल्या जाणाऱ्या अद्ययावत लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती या टीमने घेतली आहे. मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर आणि ज्युनिअर लिडर्स विंग च्या खडतर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती त्यांनी घेतली आहे.
श्रीलंकन नाविक दळाचे कॅप्टन कोसला विजयसूर्या यांच्या नेतृत्वाखालील 11 जणांच्या टीमचे स्वागत करून त्यांना कमांडो आणि प्लॅटून कमांडर्स कोर्स ची माहिती देण्यात आली.
मेजर जनरल अलोक कक्कर यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षण कसे दिले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आता ज्युनिअर लिडर्स विंग मध्ये 20 श्रीलंकन जवान प्रशिक्षण घेतील.
यापूर्वीही अनेक विदेशी तुकड्यांनी बेळगावला येऊन मराठाच्या केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. अमेरिका, चीन आणि जपान येथील जवानांनी बेळगावला येऊन संयुक्त प्रशिक्षण दलामध्ये कवायती झाल्या आहेत. आता भारतीय लष्करी कौशल्यांचा अभ्यास श्रीलंका चे नाविक दळ करणार आहे.