दुसऱ्याच्या नावावर देत होते परिक्षा-….संजय दत्त अभिनित ‘मुन्नाभाई एम बी बी एस या चित्रपटाप्रमाणे परीक्षेत एकाच्या नावावर डमी म्हणून दुसऱ्याला बसवल्याची घटना उघडकीस आली आहे.दहावीच्या परीक्षेला डमी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देणाऱ्या चार जणांना टीळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सार्वजनिक शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या चार तोतया परीक्षार्थींना ताब्यात घेतले असून ते अल्पवयीन असल्याची माहिती आहे.डीपी स्कुलमध्ये सदर प्रकार घडला आहे.हे चार जण दुसऱ्याच्या नावाने पेपर लिहीत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.एकवीस मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार घडला असून मारुती,सोमु,नागराजू आणि शेटप्पा यांच्या ऐवजी दुसरेच जण परीक्षेला बसल्याचे आढळून आले.
मुख्य पर्यवेक्षकांच्या कडे असणाऱ्या कागदपत्रावरील फोटो आणि परीक्षेला बसलेला विद्यार्थी यांचे फोटो वेगळे असल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले.त्यामुळे मुख्य पर्यवेक्षकानी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडल्या घटनेची माहिती दिली.नंतर मूळ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायला देण्यात आले.मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केलेली नसून त्या बाबत न्यायालयाला कळवले आहे.