Saturday, May 4, 2024

/

मंगळवार पासून 101 अर्ज भरण्यास सुरुवात

 belgaum

‘अब की बार 101 उमेदवार’ या घोषणे नंतर सीमा प्रश्नाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेसाठी मंगळवार पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली जाणार आहे.

बेळगाव तालुका खानापूर तालुका आणि निपाणी भागातील इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्ज भरावेत असे आवाहन मध्यवर्ती समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.तत्पूर्वी सर्व इच्छुकांनी शहर समितीचे कार्यालय रंगुबाई पॅलेस येथे आपापले अर्ज तपासून घ्यावेत छाननी करून घ्यावेत.

Mes 101 candidate

 belgaum

उमेदवारांनी 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर अफ़िडेव्हीट करायचे आहे राष्ट्रीय किंवा सहकारी बँकेत नवीन पास बुक काढून त्या पास बुकची झेरॉक्स प्रत अर्जा सोबत जोडायची आहे.प्रत्येक उमेदवाराने आपल्या दहा सुचकांसह रंगुबाई पॅलेस येथील शहर समितीच्या कार्यालयात अर्ज तपासून घ्यावा असेही कळविण्यात आले आहे.सकाळी 10 सायंकाळी पर्यंत हे कार्यालय खुले असणार आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार 101उमेदवार अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंगळवार बुधवार आणि शेवटच्या दिवशी गुरुवारी गर्दी होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.