बारावीचा निकाल लागला आणि कोण पहिला दुसरा तिसरा आले यापेक्षा एक महत्वाची बातमी आहे, आमचा पियुष इज ग्रेट ही ती बातमी.
कोण पियुष? पियुष हा प्रताप आणि अपूर्वा आढाव यांचा गोड मुलगा, तुम्ही म्हणाल १२ वी ला फर्स्ट क्लास मिळवणं आज काल खुप सामान्य गोष्ट आहे.त्याचं काय एव्हढं कौतुक ? बरोबर आहे. पण काही लोक जे पियुष ला गेली ६ वर्षे बघतायेत त्यांच्या साठी ही घटना असामान्य अशीच आहे.
चव्हाट गल्ली येथील प्रताप आणि अपूर्वा आडाव यांचा गोड मुलगा. सहा वर्षापूर्वी सेंट मेरिज शाळेत फुटबॉल खेळताना पाठीत दुसऱ्या मुलाचं ढोपर लागण्याचं साधं निमित्त झालं आणि हसता खेळता पियुष कायमचा अंथरुणाला खिळला. डॉक्टर च्या हलगर्जीपणामुळे समस्या जास्तचं वाढली. चुकीच्या निदानामुळे त्याचा कंबरेखालचा भाग कायमचा निकामी झाला..
प्रत्येक वेळी पदरात पडणारी निराशा यांनी खचून न जाता प्रताप आणि त्याचे कुटुंबीय धीराने प्रयत्न करत राहिले, करत आहेत. प्रताप ची खुप ईच्छा होती की पियुष ने पुढे शिकावं पण ही घटना घडलेल्या वर्षीच शाळेने त्याला शाळेतून काढून टाकलं. पियुष तेव्हा ८ वीला होता.
प्रिंसिपल, शासकीय कार्यालय सगळे उंबरे झिजवुन झाले पण काहीचं मदत नाही मिळाली. शेवटी प्रतापने त्याला बाहेरुन दहावी च्या परिक्षेला बसवायचा निर्णय घेतला. पियुष ची मानसिक तयारी सुरु झाली आणि कौतुक म्हणजे स्वत:चा स्वत: अभ्यास करुन पियुष दहावी पास झाला. आणि आज कुठल्याही कॉलेज मध्ये जाऊन न शिकता फक्त स्वत: च्या ईच्छाशक्तीच्या आणि अभ्यासाच्या जोरावर तो आज १२ वी फर्स्ट क्लास ने पास झाला. 63 टक्के गुण घेऊन. हॅट्स ऑफ!
एक दिवस आपला पियुष नक्की ग्रॅज्युएट होइल आणि स्वत:च्या पायावर पुन्हा उभा सुध्दा राहिलं. आडाव कुटुंबीयांच्या ह्या लढाऊ वृत्तीला त्रिवार सलाम …पियुष ने जे यश दाखवले आहे ते सर्व सुविधा मिळणाऱ्या पालकांच्या मुलांनाही शक्य नाही
पियुष तुला बेळगाव live चा सलाम