बेळगाव लोकसभा मतदार संघातील 57 उमेदवारानी आपापला आता पर्यंत केलेला खर्च निवडणूक अधिकारी (returning officer) कडे सादर केला आहे. सर्व उमेदवारांनी तीन टप्प्यात हा खर्च दाखवयाचा असून पहिल्या टप्प्यात हा दाखवला आहे.
उमेदवारांनी कोटी खर्च केलाय याचा तपशील जाहीर करण्यामागचा मुख्य उद्देश्य मतदारांना प्रचारासाठी किती कोणता उमेदवार खर्च करतोय याची माहिती कळणे गरजेचे आहे.सर्व उमेदवारांना किती खर्च केलाय कश्या साठी केलाय याच्या बिलासह निवडणूक आयोगाला खर्च दाखवणे बंधनकारक आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक उमेदवाराने जास्तीत जास्त 70 लाखा पर्यंत खर्च करणे मर्यादित आहे निवडणूक आयोगाने या उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवत नजर ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या खर्चावर नजर ठेवण्यात येत आहे.निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एकूण 57 पैकी 50 उमेदवारांचा खर्च दाखवण्यात आला आहे.यावर 11 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंतचाडिपॉझिट सह खर्च दाखवण्यात आला आहे.
आता पर्यंत काँग्रेसच्या साधूंनावर यांनी सर्वाधिक खर्च दाखवला आहे.खर्च खालील प्रमाणे आहे
V S Sadhunnavar – INC- 18,15,585
Suresh Angadi – BJP – 16,63,671
Badruddin Kamdoddi – BSP – 61167.50
Anand R Patil – IND- 26000
Dilshad S Tahasildar – IND- 27000
Vinayak B More – IND – 26110
सर्व इतर उमेदवारांचा खर्च पाहण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट देऊ शकता
https://belagavi.nic.in/en/expenditure-contesting-candidates-02-belagavi-pc/